वैशाख महीना कधीच सरला होता
तरीही त्याचा मागमुस नव्हता
रख्रखते उन, पेटलेला सूर्य
ज़लत होता आणि जाळत होता,
पृथ्वीवर आगीचा वर्षाव करत
झाडे होर्पलू लागली.......
अशक्त पक्ष्यानी घर्त्यात्च अन्थारुने टाकली ...
आसवे डोळ्यातच सुकू लागली ...... आणि .......
....... तितक्यात .... तो आला ....
त्याने फक्त गद्ग्दात केला ...
विज़ा चमकू लागल्या,
वारा सैरभैर धाऊ लागला,
आगीची जागा टपोर्या थेम्बानी घेतली,
होर्पललेली झाडे जोमाने नाचू लागली,
थकलेल्या पक्ष्यानी घर्त्यातुन हाक दीली
आणि सुकनारी आसवे हर्षाने नयनान्तुनी गालावर ओघालली
मातीने सुगंधाची उधलन केलि ...
चिमणी बालके नाचन्या गाण्यात दंग झाली ...
सारी पृथ्वी आनंदाने न्हौऊन निघाली॥
खल्खालात्या झर्याने कदेकपर्यातुनी वाट शोधली
नदी, नाल्यानी तर एकच गर्दी केलि॥
पाण्यासाठी आता जागेची उणीव भासु लागली ....
आता मात्र "त्याना " चिंता वाटू लागली
आधी तो बरसत नव्हता
आता मात्र थाम्बत नव्हता
तो रडत होता आणि त्यानाही र्डावत होता ......
झाडे गर्ठुन स्तब्ध उभी होती॥
पक्षी घरट्यात कुद्कुदत होते आणि ........ माणूस.....
माणूस मात्र थरथरत उदास मनाने शुन्य नज़रेने त्याच्याकडे पाहात होता ....
त्याने मुद्दामहून एक कटाक्ष खाली पृथ्वीवर टाकला
आणि तोच बावरुन गेला
सारेच हिर्मुस्लेले दिसत होते
झाडे नाचत नव्हती पक्षी गात नव्हते
काय झाले त्यालाच कळत नव्हते
येन्याधिही सारे रडत होते आणि आताही तेच!
तो पूर्णपणे गोंध्लुन गेला होता हलू हलू तो शांत झाला आणि दूर दूर जाऊ लागला....
पण जाता जाता तो स्वताशिच पुटपुटला, "असा कसा हा माणूस निघाला?"
--सुहास--
No comments:
Post a Comment